राज्यसभेच्या निकालानंतर मुंबई काँग्रेसची धाकधूक वाढली; विधान परिषदेसाठी नेत्यांची धावपळ सुरू...?

 



• राज्यसभेच्या निकालानंतर मुंबई काँग्रेसची धाकधूक वाढली; विधान परिषदेसाठी नेत्यांची धावपळ सुरू

मुंबई: राज्यसभा निवडणुकीसाठी चोख व्यवस्थापन करीत भाजपने महाविकास आघाडीची झोप उडविल्यानंतर आता मुंबई काँग्रेसची धाकधूक वाढली आहे. आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसकडून दोन्ही उमेदवार मुंबई काँग्रेसचे असल्याने त्यांच्या विजयाचे गणित जुळवण्यासाठी मुंबई काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची शनिवारपासून धावपळ सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, मतटक्का वाढवण्यासाठी येत्या दोन दिवसांत अनेक अपक्ष आमदारांच्या भेटीगाठी घेण्याचे प्रयत्न नेत्यांनी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.



∆ राज्यसभा निवडणुकीसाठी चोख व्यवस्थापन करीत भाजपने महाविकास आघाडीची झोप उडविल्यानंतर आता मुंबई काँग्रेसची धाकधूक वाढली







राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे तीन खासदार निवडून आले असले तरी भाजपच्या मतांच्या खेळीने शिवसेनेच्या संजय पवार यांना पराभवाला तोंड द्यावे लागले. या पराभवानंतर आघाडी सरकार आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच सर्वांच्या नजरा आता येत्या २० जून रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीकडे लागल्या आहेत. या निवडणुकीसाठी गुप्त पद्धतीने मतदान होणार असल्याने महाआघाडीच्या उमेदवारांना फटका बसण्याची चर्चा सुरू झाली असून काँग्रेसच्या गोटातदेखील धाकधूक वाढल्याची माहिती काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी 'मटा'शी बोलताना दिली.
विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन चंद्रकांत हंडोरे आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांना संधी दिली आहे. हंडोरे यांना उमेदवारी दिल्याने या अगोदरच अनेकांनी नाराजी व्यक्त केली असतानाच, गुप्त मतदानात त्यांना फटका बसू नये यासाठी मुंबई काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची शनिवार सकाळपासून धावपळ सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या निवडणुकीत हंडोरे यांना प्रथम, तर भाई जगताप यांना दुसऱ्या पसंतीचा क्रम देण्यात आला आहे. त्यामुळे भाई जगताप यांना परिषदेसाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. कोट्याचे गणित पूर्ण करण्यासाठी काँग्रेसने नवी रणनीती आखण्याची तयारी सुरू केल्याची माहिती पुढे आली आहे.


म्हणावा तितका खडतर नसेल. परंतु, दुसऱ्या पसंतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी पक्षाला अधिक मेहनत करावी लागणार आहे. त्यामुळे मुंबई काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची धाकधूक वाढल्याची प्रतिक्रिया अनेकांकडून देण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

Crop insurance : अतिवृष्टी नुकसान भरपाई

Pm Kisan Yojana Maharashtra - किसान योजनेचे पैसे मिळत नाहीत मग हे काम करा

छत्रपती शिवाजी महाराज योजनेतील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार | Chhatrapati Shivaji Maharaj karj mafi Yojana Maharashtra 2023