आजपासून दर लागू महावितरण पुढे म्हणते की, आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, महावितरण कंपनीने या याचिकेवर जनतेकडून लेखी सूचना आणि हरकती मागविल्या आणि २१ फेब्रुवारी, २०२३ ते ०३ मार्च, २०२३ दरम्यान पुणे, नवी मुंबई, अमरावती, नागपूर, औरंगाबाद आणि नाशिक जाहीर सुनावण्या घेतल्या जनतेशी सल्लामसलतीच्या या प्रक्रियेनंतर आयोगाने ३१ मार्च, २०२३ रोजीच्या आदेशाद्वारे आर्थिक वर्ष २०२३ २४ आणि २०२४- २५ साठी महावितरण कंपनीची एकूण महसुली गरज आणि वीज दर निश्चित केला आहे. सुधारित वीज दर दिनांक १ एप्रिल २०२३ पासून अंमलात येतील
Shetkari raja news:-2023महावितरण कंपनी कडून वीज ग्राहकान दर वाढीचा जोर का झटका.घरगुती दरात ६ टक्क्यांची जबर वाढ
राज्यातल्या ग्राहकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. वीज वितरण कंपन्यांनी वीज दरवाढीचा निर्णय आजपासून लागू केला असून, त्यामुळे घरगुती दरात ६ टक्यांची वाढ केली आहे. आधीच महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या सामान्यांना हा मोठा झटका आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, बेस्ट, अदानी आणि टाटा पावरने ही दरवाढ केली आहे. त्यासाठी आर्थिक तोट्याचे कारण पुढे करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने २०२३ २४ मध्ये सरासरी २.९ टक्के, तर २०२४-२५ साठी ५.६ टक्के दरवाढ केली आहे. घरगुती वीजेच्या दरात २०२३-२४ साठी सहा टक्के, तर २०२४- २५ साठी सहा टक्के वाढ असेल. बेस्टच्या ग्राहकांना २०२३-२४ साठी वीज दरात सुमारे ५.०७ टक्के झाली आहे. २०२४-२५ साठी ६.३५ टक्क्यांची दरवाढ
आजपासून दर लागू
महावितरण पुढे म्हणते की, आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, महावितरण कंपनीने या याचिकेवर जनतेकडून लेखी सूचना आणि हरकती मागविल्या आणि २१ फेब्रुवारी, २०२३ ते ०३ मार्च, २०२३ दरम्यान पुणे, नवी मुंबई, अमरावती, नागपूर, औरंगाबाद आणि नाशिक जाहीर सुनावण्या घेतल्या जनतेशी सल्लामसलतीच्या या प्रक्रियेनंतर आयोगाने ३१ मार्च, २०२३ रोजीच्या आदेशाद्वारे आर्थिक वर्ष २०२३ २४ आणि २०२४- २५ साठी महावितरण कंपनीची एकूण महसुली गरज आणि वीज दर निश्चित केला आहे. सुधारित वीज दर दिनांक १ एप्रिल २०२३ पासून अंमलात येतील

Comments
Post a Comment
मित्रानो ही वेबसाईट कोणताही धोका किंवा कोणतीही फ्रोड न्यूज तुम्हाला सांगत नाही त्या मुळे कोणत्या ही वक्तीने घान कमेंट करू नये अशी विनंती.